साऊथ चे ऍक्शन सिनेमे आपण नेहमीच टीव्ही वर किंवा युट्युब ला बघत असतो. तिकडचे ऍक्शन सिनेमे आपल्याकडे बघण्याचं प्रमाण जास्त असल्याने तेच सिनेमे हिंदीमध्ये जास्त डब होतात. त्यामुळे आपल्याकडे बऱ्याच लोकांना असं वाटत कि तिकडे असेच मारधाड चे सिनेमे तयार होत असतील. पण काही अपवाद देखील आहे. त्याचा "९६" हा सिनेमा अस्सल पुरावा आहे.
सिनेमाच्या सुरुवातीला आपला पस्तिशीतला नायक फोटोग्राफीच वर्कशॉप घेतोय. नवीन तरुण विद्यार्थ्यांना फोटोग्राफी चे धडे देतोय. त्यांच्यातलीच एक तरुणी त्याच्यावर भाळलीय. पण आपल्या नायकाला त्याबद्दल अजिबात इंटरेस्ट नाही. तो स्वतःमध्येच हरवलेला आहे. काही कामानिमित तो त्या तरुणी सोबत त्याच्या मूळ गावावरून (तंजावूर) दुसरीकडे जात असतो. अचानक त्याला त्याची शाळा दिसते. तो थांबतो. वॉचमन ला सांगून शाळेत एक चक्कर टाकून येतो. त्याच्या सगळ्या आठवणी ताज्या होतात. २० वर्षांपूर्वीच त्याला सगळं आठवायला लागत. तो तडक बाहेर येऊन शाळेतल्या आपल्या मित्राला फोन करून सान्तो कि मी शाळेत आलोय. मित्रालाही ते आवडत. त्यांचं ठरत कि आपण आपल्या बॅच च गेट टुगेदर घेऊ. ठरल्याप्रमाणे सगळे जमतात. फक्त एका मुलीची कमी असते. जरावेळाने ती हि तेथे येते. आपला नायक कुठे आहे म्हणून चौकशी करते. नायकाची नायिकेशी भेट बरोबर होते ती थेट बावीस वर्षांनी. लग्न करुन सिंगापूरला राहणारी नायिका नायकाच्या बाबतीत अजूनही हळवी आहे. तो तिच्या समोर जायला नको म्हणून कोपऱ्यात जाऊन बसलाय. आणि ती त्याच्यासमोर थेट उभी राहते. बस्स्स. नेहमीप्रमाणे तो एकदम ब्लँक होतो. आणि सिनेमा थेट फ्लशबॅक मध्ये २० वर्ष मागे जातो.
अतिशय साधीसरळ गोष्ट आहे. १९९६ सालमधील शाळेतील ९ वी ची बॅच. "के. रामचंद्रन" (विजय सेतुपती) आणि एस. जानकीदेवी (त्रिशा) अशी भारदस्त नाव असणारी एकाच वर्गातील विद्यार्थी. राम आणि जानू हे त्यांच शॉर्ट नेम. राम हा अतिशय स्वभावाने लाजराबुजरा आणि रूपाने काळासावळा असा तर जानू याच्या एकदम विरुद्ध अशी अतिशय रूपवान आणि बडबडी, तसेच खूप गोड गळ्याची गायिका. असं परस्पर टोकं असतानाही ते प्रेमात पडतात. अर्थातच राम तिच्या प्रेमात पडतो, आणि नंतर जानू सुध्दा त्याला होकार देत त्याच्या प्रेमात पार वेडी होते. शाळेत त्यांचं प्रेम बहारात असताना नववी नंतर रामच्या
वडिलांना आचानक गाव सोडावं लागल्याने तो तंजावूर वरुन थेट चेन्नईला फेकला जातो. हे इतकं अचानक होत कि जानू ला किंवा त्याच्या कोणत्याच मित्राला तो गाव सोडून जातोय हे त्याला सांगायला जमत नाही.
हे झाल्यावर सिनेमा परत आजच्या तारखेत येतो. राम ला बघून जानू ला अतिशय आनंद झालाय. अर्थात त्यालाही झालाय पण स्वभावामुळे तो दाखवत नाहीये. जानू थेट सिंगापूर वरून या कार्यक्रमाला आलेली असते. तिला दुस-या दिवशी पहाटेचं विमान असल्याने तिला रि-युनीयन नंतर चा जास्तीत जास्त वेळ राम बरोबर घालवायचा आहे. रामची अवस्था विचीत्र झालेली असते. जिच्यावर जीवापाड प्रेम आहे ती त्याच्या बरोबर असते. ती त्याच्याशी प्रचंड बोलतेय. त्याची विचारपुस करतेय पण याच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात. पण तरीही जानू सांगेल तेच तो करतो. तिला रात्री त्याच्यासोबत भटकायचय असतं. तो तिला घेउन भटकतो.रस्त्यावर..मेट्रोमधे..चालत..कारमधे. ती त्या रात्री चालू असलेल्या पार्लरमधे नेउन त्याची हजामत करुन त्याला माणसात आणते तेंव्हा स्वतःच्या दाढी मिशा नसलेल्या, केस कापलेल्या चेह-याकडे बघून तो तोंड लपवतो.
राम आणि जानू नंतर एका हॉटेलमधे कॉफी प्यायला गेलेत तिथे रात्री उशीरा एका मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला नेमक तिथेच आलेल्या त्याच्या इन्स्टिट्यूटच्या मुली जेंव्हा त्यांच्या सरांचा नवीन लुक आणि सोबत मुलगी पाहून त्यांच्यात जबरदस्ती घुसतात व त्यांना नवरा बायको समजून जानूला विचारतात की त्यांच्यात आधी प्रपोज कोणी केले? प्रसांगावधान दाखवून जानू त्यांना त्यांच्या कॉलेजमधे भेट न झालेल्या त्या दुर्दैवी प्रसंगालाच बदलून जानू त्यांची कॉलेजमधे तिथेच शाळेनंतर परत भेट झाल्याचा एक काल्पनीक प्रसंग सांगते, तेंव्हा जे घडू शकले असते ते ती सांगते पण जे प्रत्यक्षात घडले, याची वेदना फक्त एक दोन सेकंदासाठी चेह-यावर आणून दुर्दैवी राम जानूकडे फक्त बघत असतो. जानू आग्रह करते म्हणून तिला आपल्या घरी घेउन जातो. त्याने शाळेत पब्लीकली अनेकवेळी आग्रह केलेले पण तिने न गायलेले 'जमुना तट' हे गाणे ती त्याच्यासमोर त्याच्या एकट्यासाठी गाते तेंव्हा तो देहभान हरपून बसलेला असतो. त्या रात्री एकांतात, जानूचे त्याच्या एवढ्या जवळ असण्याचा, तिच्या vulnerable अवस्थेचा फायदा तो घेउ शकत असतो पण... मनात असलेल्या इतक्या वर्षांच्या तिच्या प्रेमळ आठवणींचं ठिणगी पडून तिचे आगीत रुपांतर होणार नाही याची काळजी घेणारा राम इथे सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठरतो.
शेवटी तिला सोडायला जात असताना कार मध्ये दोघींची अवस्था केविलवाणी झालेली असते. त्यांना माहितीय कि आजच्या नंतर आपण कदाचित भेटू कि नाही ते त्यामुळे दोघीही काहीच बोलत नाहीत. अन शेवटच्या एअरपोर्टवरच्या प्रसंगात जेंव्हा जानू उन्मळून पडते तेंव्हाही स्वतःला व पर्यायाने तिला राम सावरतो. अलिंगन नाही, चुंबन नाही, साधा हँडशेकही नाही. मागे उरते ते फक्त दोघांचे एकमेकांवर असलेले निस्सीम प्रेम.
बस्स.. आणखी काय लिहू. ते हॉटेल मध्ये जानू च्या रूम मध्ये गप्पा मारत असतात ते मुद्दाम लिहिलं नाहीय. स्पॉइलेर अलर्ट म्हणून. बाकी एक प्युअर क्लासिक टच असलेली प्रेमकहाणी बघायची असेल तर "९६" हा बेस्ट चॉईस आहे.
शुभम शांताराम विसपुते
No comments:
Post a Comment