MX प्लेअर ची गेल्यावर्षी प्रदर्शित झालेली वेब सिरीज. नुकताच या सिरीज चा दुसरा सीजन देखील येऊन गेला. अतिशय साधी सोपी अशी हि सिरीज आहे. नवरा बायको च्या रोजच्याच आयुष्यावर बेतलेली. सिरीज ची कथा एकदम साधी सिम्पल आहे, एका एपिसोड मध्ये संपणारी. प्रत्येक एपिसोड ला नवीन कथा असल्याने कुठलाही एपिसोड कधीही बघू शकतो. दोन्ही सीजन मध्ये प्रत्येकी ६ एपिसोड्स आहेत. तेही फक्त १८ ते २० मिनिटांचे. एका बैठकीत पूर्ण सीजन पाहून होतो. दोन्ही सीजन MX प्लेअर वर पूर्णपणे निःशुल्क उपलब्ध आहेत.
साकेत (उमेश कामत) आणि जुई (प्रिया बापट) या रिअल लाईफ कपल ची प्रत्यक्ष आयुष्यातील जी उत्तम केमिस्ट्री आहे ती स्क्रीन वर देखील दिसते. दोघीनी एकदम छान काम केलंय. प्रिया मस्तच काम करते पण इथं उमेश थोडा तिला वरचढ झालाय. इतकं सहज सुंदर त्याने काम केलय. त्याच्या क दर्जाच्या फालतू जोक्स वर तीच इरीटेट होणं हे बघायला छान वाटतं. उमेश आणि प्रिया व्यतिरिक्त तिसरं कुठलंही मुख्य पात्र यात नाहीये, आणि जी हि पात्र आलीत ती अगदीच थोड्या वेळासाठी असल्याने सिरीज चा पूर्ण फोकस हा या दोघींवरच आहे.
सिझन १ : पहिला एपिसोड आहे "नवं घर" यात दोघीही पुण्यात आय टी सेक्टर मध्ये काम करणारी आहेत. त्यांचा नवीन घरातला प्रवेश यावर हा एपिसोड आहे. पूर्ण एपिसोड नवीन घर कसं लावायचं, सजवायचं यावरच आहे. शेवटी साकेत जुई ला जो सरप्राईझ म्हणून बॉक्स देतो त्या हैप्पी नोट वर एपिसोड वर संपतो, अर्थात सिरीज चे सगळेच एपिसोड हे हैप्पी नोटवरच संपतात. पुढच्या एपिसोड मध्ये दोघी "नवी कार" घेतात. त्या कार घेताना शो-रूम मधल्या सेल्समन सोबतच सीन धमाल आहे. नंतर कार वर पडलेल्या ओरखडा मिटवण्यासाठी केलेले विविध प्रयोग मजा आणतात. तिसऱ्या एपिसोड मध्ये साकेत ला त्याची आई बनवते तशी "पुरणपोळी" खायची असते. जुई ला तो नेहमी हिणवतो कि तुला माझी आई बनवते तशी पुरणपोळी कधी जमणारच नाही. शेवटी ती पहिल्यांदा खूप कष्टाने पुरणपोळी बनवते आणि साकेत ला सरप्राईझ देते. पुरणपोळी खाताना साकेत आई ला फोन करतो आणि नंतर जो धक्का दोघीना बसतो तो बघण्यासारखा आहे. चौथ्या एपिसोड मध्ये दोघीना आपल्या रोजच्या ऑफिस वर्क मधुन "छोटी सुट्टी" हवी असते. ती ते कशी मिळवतात आणि कुठे जाण्याचा प्लॅन करतात ते या एपिसोड मध्ये आहे. थोडासा संथ आहे पण एकंदरीत हा एपिसोड चांगला आहे. पाचव्या एपिसोड मध्ये जुई ला अचानक साक्षात्कार होतो कि तीच वजन वाढलंय. आता "कमी वजन" करण्यासाठी दोघी बिचारे खासकरून साकेत किती कष्ट घेतो ते या एपिसोड मध्ये आहे. शेवटच्या आणि सहाव्या एपिसोड मध्ये एका रात्री अचानक उठून जुई ला साकेत शी तिच्या पास्ट बद्दल "मोकळं मन" करायचं असत. मग विषय निघालाच असतो तर दोघी ठरवतात कि दोघीनी आपल्या पास्ट बद्दल सांगावं. एकच नंबर असलेला हा एपिसोड या लेखाच्या शेवटी दिलेल्या शायरी वर संपतो.
सिझन २ : पहिल्या सिझन सारखाच हा सिझन आहे. दोघींच्या लग्नाला आता ३ वर्षे झालीत. पहिला एपिसोड दोघी त्यांच्या मित्र आणि त्याच्या बायको बरोबर रेस्तराँत जेवण करताना अचानक मित्राने त्याच्या घरी पाळलेल्या 'चिनू' या कुत्र्याचा विषय निघतो. मग नंतर हे दोघी ठरवतात कि "कुत्रा कि मांजर" यातलं काय पाळायचं. ते नेमकं काय पाळतात कुत्रा कि मांजर त्यांना कसे मिळतात हे या एपिसोड मध्ये आहे. पुढल्या एपिसोड मध्ये साकेत चा मित्र असलेल्या धनंजय माने (प्रियदर्शन जाधव) कडे असलेल्या तबल्याच्या गाद्या (तुंबळ) घेण्यासाठी दोघी जातात. तिघांचा त्याच्या घरातला सीन अगदी तुफान झालाय. प्रियदर्शने केवळ त्याच्या जबरी एक्स्प्रेशन वर अक्खा सीन खाल्लाय. तुंबळ घरी आणल्यावर साकेत ला तबला शिकायची हुक्की येते आणि नंतर तो कसं "धा धिं धा" करतो हि बघायची मजा आहे. तिसऱ्या एपिसोड मध्ये साकेत च "छोटं आजारपण" उदभवत म्हणजे त्याला फक्त सर्दी होते. पण त्या आजारपणाचा तो किती बाऊ करतो. जुई ला किती त्रास देतो आणि तीपण त्याची किती काळजी घेते हे सगळं या एपिसोड मध्ये आहे. चौथ्या एपिसोड मध्ये जुई च्या गावाकडून तिची मावशी आजी आणि नारळ आजोबा आलेले असतात. आजोबाना "भुताच्या गोष्टी" सांगायची जाम हौस असते. रात्री जेवणाला बसताना लाईट जाते, तेव्हा मेणबत्तीच्या प्रकाशात ते गोष्ट सांगतात. त्या पूर्ण सीन मध्ये ते ज्या प्रकारे गोष्ट सांगतात ते आणि त्यावर घाबरट साकेतची प्रतिक्रिया बघणं म्हणजे निव्वळ धमाल आहे. पाचव्या एपिसोड मध्ये जुई ला तीन दिवसांसाठी बेंगळूर ला बिसनेस मिटिंग साठी जावं लागत त्यामुळे त्यांच्यात जो "थोडा दुरावा" निर्माण होतो. त्यासोबत ते दोघी कशी डील करतात हे या एपिसोड मध्ये आहे. शेवटच्या एपिसोड मध्ये लग्नाची अनिव्हर्सरी सेलिब्रेट करत असताना अचानक "बेबी प्लॅनिंग" चा विषय निघतो. जुई ची मनापासून इच्छा आणि तयारी असते बाळ जन्माला घालण्याची पण साकेत अजून तयार नसतो. दोघींचं या विषयावर एकमत होत नसत, त्यामुळे रात्री घराच्या गच्चीवर आणि नंतर एका पुलावर दोघी बोलतात. जुई कश्याप्रकारे साकेत ला पटवून देते हे या एपिसोड मध्ये आहे. थोडासा इमोशनल टच त्या शेवटच्या दोघींच्या संभाषणात आहे. जुई च कन्टिन्यू बोलणं आणि साकेत च फक्त आश्वासक नजरेने तिच्याकडे बघणं हे त्या शेवटच्या सीन ला अजूनच डीप बनवत.
वेब सिरीज बघताना प्रत्येक वेळेला हाणामारी, शिव्या, इंटिमेट सीन हे सगळं बघायला मिळेल याची आपल्याला कल्पना असते किंवा थ्रिलर असेल तर डोकं जागेवर ठेऊन एकेक पैलू लक्षपूर्वक बघावा लागतो. पण काही अपवाद असतात "आणि काय हवं...?" सारखे जी जिथं समोर घडत असलेली गोष्ट तुम्हाला डोक्याने नाही तर मनाने बघावी लागते. डोक्याला शॉट लावनाऱ्या या वातावरणात अश्या हलक्याफुलक्या सिरीजमुळे तेवढाच रिलीफ मिळतो.
दोनच शब्दात या सिरीज च वर्णन करायचं झालं तर ते म्हणजे "कमाल.... बहार..." बस्स इतकंच करता येईल.
दिल की बातो को आज केहना है तुमको...
धडकन बन के तेरे दिल में रहना है हमको...
कही रुक ना जाये मेरी सांसे...
इसलिये हर पल तेरे साथ जीना है हमको.... !
शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment