२००० साली प्रदर्शित झालेल्या या कल्ट सिनेमाला नुकतंच २० वर्षे पूर्ण झाली. तेव्हा संपूर्ण जगाने एकविसाव्या शतकात पदार्पण केले होते, तरीही भारतीय इतिहासात खूप कमी अश्या कॉमेडी- कल्ट सिनेमे बनत होते. पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीला काहींना काही तरी अपवाद असतात तसेच या सिनेमाला पण होते. एक प्युअर कॉमेडी ची असलेली कमी या सिनेमाने भरून काढली होती. ३१ मार्च, २००० हा दिवस भारतीय सिनेसृष्टीमध्ये लिहून ठेवायला हवा असा दिवस, याच दिवशी बरोबर २० वर्षा पूर्वी नीरज व्होरा लिखित आणि प्रियदर्शन दिग्दर्शित "हेरा फेरी" प्रदर्शित झाला होता आणि एक नव्या कॉमेडी पर्वास दिशा मिळाली होती.
जेव्हा स्क्रिप्ट फायनल झाली तेव्हा संजय दत्त ला "श्याम" च्या सुनील शेट्टी च्या जागी घ्यायचं ठरलं होत. पण तारखांच्या प्रॉब्लेम मुले ते शक्य झालं नाही. नंतर त्याच्या ऐवजी अजय देवगण ला विचारलं गेलं, पण अजय ला अक्षय करत असलेला "राजू" चा रोल करायचा होता. पण लेखक नीरज व्होरा ला राजू म्हणून अक्षयच हवा होता. सुनील शेट्टी ने त्या अगोदर कॉमेडी केली नव्हती त्यामुळे त्याला घेणं हि रिस्कच होती. पण शेवटी त्याचीच वर्णी लागली. तसेच तब्बू च्या "अनुराधा" साठी अगोदर करिष्मा कपूर ला घेण्याचे ठरले होते. काही कारणामुळे ते शक्य झालं नाही त्यामुळे शेवटी त्या भूमिकेसाठी तब्बू ची एन्ट्री झाली. राजू प्रमाणेच एक रोल होता जो लिहितानाच फायनल झालं होत कि कोण करेल तो रोल म्हणजे परेश रावल यांनी अजरामर केलेला "बाबुराव गणपतराव आपटे"
९० च्या दशकात अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी आपल्या ऍक्शन सिनेमांनी धुमाकूळ घालत होते. दोघांचेही अनेक सिनेमे या काळात हिट झाले. पण दशकाच्या शेवटी दोघांचे जवळपास सगळेच सिनेमे दणकून आपटले होते. दोघींचाही बॅड पॅच सुरु होता. अश्यातच हेरा फेरी आला. आणि पुढे इतिहास घडला. अक्षयच्या करिअर मधला माईलस्टोन सिनेमा आहे हा, या नंतर अक्षय कुमार थेट सुपरस्टार हेरोंच्या लाईन मध्ये जाऊन बसला.
ठरवूनन केलेले विनोद आणि सहजरित्या आलेले विनोद यात खूप फरक आहे आणि तो हेरा फेरी बघताना जाणवतो. श्यामच निरागस असणं, काहीही कष्ट न करता झटपट श्रीमंत होण्याची स्वप्न बघणार राजू, दयाळू पण तेव्हडाच विनोदी बाबूराव आपटे, श्याम सारखीच नोकरी वर हक्क मागणारी करारी पण तेव्हडीच प्रेमळ अनुराधा या सर्व कलाकृती आपल्याला आपल्यातल्याच वाटतात. चित्रपाटाच्या सुरवातीपासूनच जी करमणूक व्हायला सुरवात होते ती शेवटपर्यंत टिकून राहते या वरूनच कळते कि स्क्रिप्टची बांधणी किती मजबूत होती ते. आज हि हा चित्रपट कधीही दूरचित्रवाहिनी वर लागला कि पाहिल्याशिवाय राहवत नाही.
कल्ट क्लासिक असलेल्या या सिनेमाचा पुढचा भाग देखील "फिर हेरा फेरी" या नावाने येऊन गेला. पहिल्या भागाची सर नसली तरी सिनेमा छानच होता. पहिल्या भागाचा लेखक नीरज व्होरा ने हा भाग दिग्दर्शित केला होता. आता असं ऐकण्यात आलय की याचा तिसरा भाग देखील येणार आहे. पण त्यात राजू च्या भूमिकेत अक्षय नसेल अशी चर्चा आहे. अक्षय नसला तर तो फक्त नावाला हेरा फेरी राहील. कारण अक्षय-सुनील शेट्टी-परेश रावल या त्रिकुटाने जे काम करून ठेवलाय तिथपर्यंत कोणी पोहचेल असं सध्या तरी वाटत नाही. अक्षय ला घायच नसेल तर त्या पेक्षा सिनेमा बनवायलाच नको. कारण त्याच भविष्य काय असेल हे आताच दिसतंय.
आमचं बालपण समृद्ध करणाऱ्या या सिनेमाला, याच्या लेखक-दिग्दर्शकाला, यातल्या प्रत्येक कलाकाराला सर्व टीम ला सिनेमाच्या २० व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा...!!!
शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment