फार कमी असे लोक असतात, जे आपल्या मनात खास घर करून असतात. त्यात मग मित्र असेल, शिक्षक असेल, खेळाडू असेल पण जर गोष्ट अभिनयाची असेल तर इरफान खान चे नाव त्यासोबत जोडलं जात नसेल तर मला वाटत हे ह्या जगात तरी शक्य नाही. ही गोष्ट खरी आहे की, आयुष्य चालतं राहत लोकं येतात, जातात. पण आपल्या मनात एक खास जागा नेहमी रिकामी राहून जाते त्या जागेला भरून काढणं कधीही शक्य नाही होत. इरफान च्या जाण्याने ती जागा आजपासून कायमची रिक्त झाली आहे. सालं, आपल्या आतील काहीतरी संपून गेलंय हे फिलिंग फार वाईट असतं. नेमकं हेच फिलिंग आज येतंय.
मी गेल्यावर्षीपासून ब्लॉग लिहायला लागलो. मला पहिलाच ब्लॉग माझ्या अत्यंत आवडीच्या इरफान किंवा के के मेनन वर लिहायचा होता. मी के के वर लिहिला, म्हटलं इरफान वर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी लिहू कारण माझ्यासारखाच तोही जानेवारीतला असल्याने (७ जानेवारी) थोडा जास्त जवळचा आहे. पण काही कारणास्तव ते राहून गेलं. पण कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं इरफान गेल्यावर त्याच्यावर ब्लॉग लिहावा लागेल. जे स्वप्नात वाटलं नव्हतं दुर्दैवाने ते आज प्रत्यक्षात घडलय. मन अजूनही मानायला तयार नाहीये. इरफान गेला. खरं म्हणजे तो जाणार होताच, हे त्याला आणि त्याच्यावर जीव असणाऱ्या प्रत्येकाला ठाऊक होतं. काही गोष्टी निश्चित असतात. आपल्यालाही त्या ठाऊक असतात. फक्त आपण त्या मान्य करत नसतो. फरक असतो तो हाच. इरफानला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा त्याने जे पत्र लिहिलं होतं त्यावरून ठाऊक होत शेवट काय होणार आहे पण तरीही दरवेळी जसा युवराज सिंग, मनीषा कोईराला बरे झाले तसा तो बरा होईल आणि दमदार पुनरागमन करेल हा विश्वास वाटत होता. अंग्रेजी मिडीयमच्या ट्रेलरच्या शेवटी "वेट फॉर मी" असं बोलून स्वतः कधीही परत येऊ शकणार नाही अश्या ठिकाणी निघून गेलाय.
"साहबजादे इरफान अली खान" असं भारदस्त नाव घेऊन जयपूरच्या राजघराण्यात जन्माला आलेला हा मुलगा. पण राजघराणे फक्त नावाचे राजघराणे होते. घरात गरिबी होती. त्याच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय होता. त्याची लहानपणापासून क्रिकेटर व्हायची जबरदस्त इच्छा होती. फक्त इच्छाच नाही तर तशी त्याची मेहनत देखील होती. प्रतिष्ठेच्या सी के नायडू स्पर्धेत त्याची निवड झाली होती. पण काही आर्थिक कारणांमुळे तो भाग घेऊ शकला नाही. काहीवेळा वाईटातून चांगलं होतं असं म्हणतात ते खरंही होत. क्रिकेटर न झाल्यामुळे तो अभिनयाकडे वळला आणि पुढचा इतिहास सगळ्यांना ठाऊकच आहे. इरफान स्वतः इतका डाउन टू अर्थ माणूस होता की राजघराण्याची निशाणी दाखवणारं नावातील "साहबजादे" काढून तो आपला साधा इरफान खान झाला. आणि नंतर नावापुढे धर्माचं लेबल नको म्हणून खान काढून फक्त "इरफान" म्हणून राहिला. शेवटपर्यंत.
मी इरफान ला सर्वात अगोदर पाहिलं होत ते "आन - मॅन ऍट वर्क" सिनेमात पठाणवाडीत राहणारा युसूफ पठाण हा व्हिलन त्याने जबरी रंगवला होता. त्या सिनेमात अक्षय कुमार, सुनील शेट्टी दोघी ऍक्शन करत असताना हा मात्र वेगळ्याच स्टाईल मध्ये फक्त डायलॉग बोलतोय आणि आपले मोठे डोळे गरगर फिरवतोय. तेव्हापासून कायमचा लक्षात राहिलाय. त्यानंतर स्टार टीव्ही ला "मानो या ना मानो" नावाचा अफलातून शो लागायचा, त्याच अँकरिंग तो करायचा. बस या दोन गोष्टी लहानपणापासून त्याच्यासोबत जोडल्या गेल्या. यासोबतच त्याची हच ची "छोटा रिचार्ज" वाली जबरी जाहिरात. खुर्ची वर बसून तीस-चाळीस सेकेंड्सचा त्याचा डायलॉग आज पण लक्ख आठवणीत आहे.
इरफान हा एकच खान असा होता की ज्याच्या अभिनयाच्या दर्जाबद्दल कोणालाही शंका नव्हती, इतकी वर्ष काम करूनही तो कोणत्याही वादात नव्हता, फिल्म कशीही असली, तरी जो कायमच संस्मरणीय काम करुन दाखवायचा. पडद्यावर आणि पडद्यामागे लोकांना तेवढाच प्रिय असलेला अभिनेता. सिनेमाने कायम लोकांना जोडण्याचं काम केलेलं आहे आणि "इरफान" म्हणजे सिनेमांमुळे लोकांशी जोडलं जाण्याचं उत्तम उदाहरण आहे. आज त्याच्या जाण्याने त्याच्या असंख्य चाहत्यांप्रमाणे ज्यांना सिनेमाची इतकी आवड नाहीये त्यांनीही त्याच्यासाठी श्रद्धांजली चे स्टेटस ठेवलेय, पोस्ट लिहिल्या आहे. आज त्याच्यासाठी लिहिल्या जाणाऱ्या प्रत्येक पोस्ट मध्ये, मेसेज मध्ये जी आत्मीयता आहे ती या आधी कुणा अभिनेत्यासाठी किंवा नेत्यांसाठी दिसली नाही. भविष्यात दिसेल की नाही माहित नाही पण आज तरी ती वेगळी आहे, मनापासून आलेली आहे आणि इरफान ने आयुष्यात कमावलेली सगळ्यात मोठी गोष्ट कुठली तर हीच.
इरफान ने काम केलेले बहुतांश सिनेमे मी पाहिलेय. प्रत्येक सिनेमातल्या फक्त त्याच्या रोल बद्दल जरी लिहायचं झालं तर कित्येक ब्लॉग लिहावे लागतील. इतकं उत्तुंग काम त्याने करून ठेवलय. अभिनय आवडणाऱ्या आणि अभिनय शिकण्याची इच्छा असणाऱ्यासाठी तो अमूल्य असा ठेवा ठेऊन गेलाय. त्याने काम केलेल्या सगळ्या सिनेमाचं कलेक्शन करून ठेवायचं आहे. या अस्सल सुपरस्टारच्या काळात आम्ही जन्मलो, त्याच काम आम्ही पाहिलं हे येणाऱ्या पिढीला दाखवायचं आहे.
इरफान ने केलेल्या ज्या कामामुळे मी त्याचा आयुष्यभरासाठी फॅन झालो. ते थोडक्यात सांगतो.
हासील मधला कॉलेजमधील युवादलित नेता "रणविजय सिंग" समोर आशुतोष राणा सारखा मुरलेला ऍक्टर असताना त्याच्यासोबतची इरफानची जुगलबंदी अविस्मरणीय अशी होती. कॉलेज पॉलिटिक्स वर असणारी हि क्लासिक फिल्म होती.
मकबूल मधला स्वतः "मकबूल उर्फ मियाँ". इरफान काय चीझ आहे हे बॉलीवूड ला या सिनेमातून कळलं. अतिशय पॉवरफुल परफॉर्मन्स होता त्याचा या सिनेमात. पंकज कपूर, नासिरुद्दीन, ओम पुरी, पियुष मिश्रा आणि साक्षात तब्बू इतकी कसलेली कास्ट असताना देखील इरफान चा अभिनय या सर्वांवर कडी करणारा होता. शेक्सपिअरच्या 'मॅकबेथ' च मकबूल हे हिंदी रूपांतरण होत. दोन प्रसंग यातले लक्षात आहे, पहिला पंकज कपूरच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी
इरफान स्वतः बिर्याणी बनवत असतो, तेव्हा पंकज कपूर त्याला जवळ घेऊन पाठीवर हात ठेवून म्हणतो, "यारा, कितनी मोहब्बत से पका रहा हे, दिल कर रहा हे मेरा भी गोश्त पकवालू" बस्स हीच तर त्याची आपल्या कामाप्रती असणारी मोहब्बत होती. आणि दुसरा होता, प्रेयसी तब्बू गरोदर असताना त्याचा हात आपल्या पोटावर ठेवते आणि म्हणते "तुम्हाराही हें, मियाँ" पण इरफान च्या मनात संशय असल्याने तो तिच्याशी नजर देखील भिडवत नाही. हा सिन फक्त डोळ्यांनी त्याने असा काही केलाय की शब्दात वर्णन नाही करता यायचं.
लाईफ इन या मेट्रो या मल्टिस्टारर सिनेमातला त्याचा "मॉन्टी" एक हरहुन्नरी अस पात्र आहे. जो प्रत्येक गोष्ट गमतीत करतोय, पण गमतीगमतीत जगण्याचं खूप मोठं सार तो यात सांगून गेलाय. कोंकणा सेन ला समजवताना तो शहराबद्दल खूप छान बोलला आहे. "ये शहर जितना हमे देता है, बडलेमे उससे कई ज्यादा हमसे ले लेता है" कुठल्याही मेट्रो सिटीची वर्णन या एका ओळीत त्याने चपखलरित्या केलं आहे.
बिल्लू मधला त्याचा सिनेस्टार साहिर खान आपला मित्र आहे असं गावात सांगणारा आणि शेवटी आपल्या मित्राला प्रेमानं मिठी मारणारा गरीब बिल्लू मस्तच आहे.
रोग सिनेमातला त्याचा अंडररेटेड परफॉर्मन्स असलेला त्याचा इन्स्पेक्टर जबरदस्त आहे. खासकरून "मै आत्महत्या करणे वाला था" हा सीन जमून आलेला आहे. या सीन मधील इरफानचा पॉझ घेत आवाज वरखाली करत असलेला डायलॉग अविस्मरणीय आहे. के के च काळजाला हात घालणारं "मैने दिल से कहा" हे गाणं याच सिनेमाचं.
पान सिंग तोमर इरफानचा सर्वश्रेष्ठ अविष्कार ज्यासाठी त्याला बेस्ट ऍक्टर च नॅशनल अवॉर्ड मिळालं. भूमिका जगणं म्हणजे काय असत हे बघायचं असेल तर या सिनेमातील इरफान ला बघा. एक जागतिक स्तरावरचा धावपटू ते चंबळ मधला अव्वल डाकू हा प्रवास त्याने जबरदस्त दाखवला आहे. "जब देश के लिये दौडे तो किसीने ना पुछीयो, अब बागी बन गये तो सब पूछ रहे है" आणि "बिहाड मै बागी होते है, डकैत मिलते है पार्लमेंट मै" असे क्लासिक डायलॉग त्याला या सिनेमात होते. सिनेमात गरमागरम गुलाबजामून मध्ये त्याच वॅनिला आइसक्रीम टाकून खाणं लक्षात राहून जात.
मुंबई मेरी जान यामध्ये तो रात्री रस्त्यावर कॉफी विकणारा "थॉमस" म्हणून आपल्याला भेटतो. अत्यंत गरीब असूनही समाधानी असणारा, आणि शेवटी गमतीत मॉल मध्ये बॉम्ब असल्याची अफवा ठोकून देणारा इरफान मॉल मध्ये जेव्हा पळापळ सुरु होते, आणि एक म्हातारे बाबा धडपडताना त्याला दिसतात. तेव्हा त्याला होणार पच्छाताप त्याने खूप सुंदर दाखवलाय.
लाईफ ऑफ पाय या ऑस्कर विजेत्या हॉलिवूड पटात तो मोठेपणाच्या "पाय पटेल" मध्ये दिसतो. जो पूर्ण कथा सांगत असतो. आज माझ्यासहित बऱ्याच जणांनी जो स्टेटसला विडिओ ठेवलाय, The whole of life becomes an act of letting go. But what always hurts the most is not taking a moment to say goodbye. हा डायलॉग याच सिनेमातला आहे.
साहेब बीवी और गँगस्टर मध्ये "हमारी तो गाली पे भी ताली पडती है" म्हणत एन्ट्री घेणारा इंद्रजीत सिंग. इरफान या सिनेमात खूप राजबिंडा दिसलाय. यातला माझा आवडता अजून एक डायलॉग, "चांद पर बाद मै जाना जमानेवालो, पहले धरती पर तो रेहना सिख लो"
द लंचबॉक्स मधला रिटायमेन्टला आलेला "साजन फर्नांडिस" इरफानच्या संयत अभिनयाचं उदाहरण आहे. बायको, मुलं नसल्याने आलेलं एकटेपण, प्रेमासाठी आतुर असलेला साजन जेव्हा अचानक भेटलेल्या (फक्त पत्रा मार्फत) इला मध्ये गुंतत जातो. पण एका महत्वाच्या क्षणी आपल्या वयाच भान ठेऊन बाजूला होतो. इला ला तो जे शेवटचं पत्र पाठवतो ते इरफान च्या आवाजात ऐकणं म्हणजे सोहळा आहे.
पिकू मधला "राणा चौधरी" अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण सारखे सुपरस्टार असताना आपल नाणं चोख वाजवतो. बाप-मुलीला एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावतो.
हैदर मधला काळा चष्मा लावून लंगडत चालणारा "रुहदार" कोण विसरेल.
तलवार या क्राईम थ्रिलर मधला सिबीआय ऑफिसर "अश्विन कुमार" हा इरफान चा माझा आवडता वन ऑफ बेस्ट रोल आहे.
जज्बा हा सिनेमा खरंतर ऐश्वर्या रॉय ला समोर ठेऊन बनवला गेलेला सिनेमा पण यात भाव खाऊन जातो तो इरफानचा इंस्टपेक्टर "योहान". एक से एक भारी डायलॉग त्याला या सिनेमात दिले आहे. आणि ते फक्त त्याच्याच आवाजात सूट झाले असते. "मोहब्बत थी इसलिये जाणे दिया, जिद होती तो बाहोमे होती" बस्स हा एकच डायलॉग सगळी गोष्ट सांगायला पुरा आहे.
बाजीराव मस्तानी मधल्या आपल्या खर्जातल्या आवाजातल त्याच नॅरेशन लक्षात राहतं. क्लायमॅक्स ला दोघी गेल्यावर "उसदिन अपनी बेहरहमी पे सबसे ज्यादा वक्त रोया था" हे इरफान च्या आवाजात एकूण अंगावर काटा येतो.
मदारी हा स्वतः इरफान ने प्रोड्युस केलेला सिनेमा. आपल्या मुलावर नितांत प्रेम करणारा "निर्मल कुमार" इरफान ताकदीने उभा करतो. त्याची गुन्हा करण्याची पद्धत जरी चुकीची असली तरी सहानभूती मात्र तो मिळवून जातो.
जंगल बुक या मोगलीच्या सिनेमात पंजाबी मध्ये बोलणाऱ्या "बल्लू" या अस्वलाला त्याने झकास आवाज दिला आहे.
हिंदी मेडीयम मध्ये आपल्या मुलीची इंग्रजी शाळेत ऍडमिशन घेण्यासाठी धडपड करणारा साडी दुकानदार "राज बत्रा" आपल्या अफलातून कॉमिक टाईमिंग ने खूप हसवतो. दीपक डोब्रियाल सोबतची त्याची जुगलबंदी धमाल आहे. यातलं क्लायमॅक्सच शाळेच्या स्टेज वरचं त्याचं भाषण कमाल आहे.
कारवा हा इरफान चा माझा खूप आवडीचा पिक्चर. दोन नवीन कलाकारांना सांभाळून घेत त्याच्या "शौकत" ने या सिनेमात जी बॅटिंग केलीय. ती जबरदस्त आहे. खासकरून सिनेमात असलेले त्याचे "वन लायनर" इरफान किती एफर्टलेस कॉमेडी करू शकतो याचे उदाहरण आहे.
करीब करीब सिंगल यातला त्याचा फुल्ल ऑन "योगी" भारी आहे. साऊथची अभिनेत्री पार्वती आणि इरफान हे दोनच कलाकारांचा हा सिनेमा. अजिबात सिरिअस नसणारा आणि अतिशय पांचट जोक्स करणारा योगी धमाल आणतो. यात पार्वती जेव्हा त्याला विचारते तुमने कभी इश्क किया है, त्यावर इरफान म्हणतो, "जी तीन बार किया है और तिनो हि बार एकदम घनघोर, जाणलेवा मतलब हद पार इश्क" इरफान तुझ्यावर आमचं असच इश्क आहे.
ब्लॅकमेल मधला पत्नीकडून फसवला गेलेला भोळा पती "देव" नंतर सिनेमात काय धुमाकूळ घालतो हे बघण्यासारखं आहे.
अंग्रेजी मेडीयम खूप इच्छा होती हा सिनेमा थिएटर ला बघण्याची तसं सर्वाना सांगूनही ठेवलं होत. कारण दोन वर्षांनंतर तुझा सिनेमा येत होता. आणि तो थिएटरलाच बघायचा होता. पण लोकडॉउन मुले थिएटर बंद झाली, आणि बघायचा राहून गेला. हे शल्य आयुष्यभर कायम राहील. अर्थात नंतर तो मी बघितला, खर सांगायचं तर थकलेला इरफान बघवत नव्हता. हा आमचा इरफान नव्हताच, आमचा इरफान असा एनर्जी ने भरलेला तुफान काम करणारा होता. याच ट्रेलर मधलं तुझा आमच्याशी साधलेला संवाद रडवून गेला होता.
आजवर मला कोणीही विचारलं तुझा आवडता हिरो कुठला, तर मी प्रत्येक वेळेला तुझंच नाव घेतलय, यापुढेही घेत राहिलंच. माझ्यासारख्या असंख्य चाहत्यांनी तुझ्यावर इतकं जीवापाड प्रेम केलंय आणि तू हा असा डाव अर्ध्यावर टाकून निघून गेलास. आम्हाला तू हवाहवासा वाटत होतास आणि म्हणूनच आम्हाला वाटत की तू जायला नको होतास. मनोज बाजपेयी, के के मेनन आणि इरफान या त्रिमूर्ती मधली तुझ्या जाण्याने एक मूर्ती कायमची देवघरात विसावली आहे. तुझ्या जाण्याने आज एका युगाचा अंत झालाय. युगांत...!!!
"कहाणी खत्म हुई और ऐसी खत्म हुई कि लोग रोने लगे तालिया बजाते हुए...!!!"
शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment