आज रामनवमी चा पवित्र दिवस. गेल्या कित्येक वर्षात जे घडलं नाही ते आज घडलं, ते म्हणजे बंद देवळात प्रभू रामरायाचा जन्म आज साजरा करावा लागला. असो, देशावर संकटच असं आलंय त्यामुळे अशी समजदारीची भूमिका घ्यावी लागते. मला गर्व आहे कि "समजूतदार" अश्या हिंदू धर्मात माझा जन्म झालाय याचा.
रामनवमी निमित्त नेहमी आठवतं ते आशुतोष गोवारीकरच्या "स्वदेस" मधील रामलीला च्या वेळेचं गाणं. निव्वळ अप्रतिम या दोनच शबद त्याच वर्णन करता येईल असं ते गाणं आहे. एरवी मी ते ऐकतोच, पण रामनवमीच्या दिवशी ते युट्युब ला बघायची मजा आहे. जी मी तर नेहमीच लुटतो. गोवारीकरने खूप सुंदर रित्या या गाण्याचं पिक्चरायझेशन केलय. आपल्या महाराष्ट्रात रामलीला चा कार्यक्रम होत नाही. उत्तर भारतात तर तो तिथल्या संस्कृतीचा ठेवा आहे. खास रामलीला बघण्यासाठी उत्तर भारतात जाण्याऐवजी गोवारीकरने आपल्याला सिनेमाच्या माध्यमातून खूप छान अशी रामलीला दाखवली आहे.
सिनेमाची नायिका "गायत्री जोशी" ही यात सीतेच्या भूमिकेत आहे. सीतेच्या रूपात तीच नावचं गायत्री असल्याने ती खूप सुंदर दिसलीय. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे, धार्मिक नजरेतून बघायचं झालंच तर याचा संगीतकार द ग्रेट ए आर रहमान आहे, लिहिलंय जावेद अखतर यांनी आणि स्क्रीनवर आहे शाहरुख खान. हा खरा भारत आहे. ज्याने सगळ्यांना आपल्यात सामावून घेतलय.
आज मी त्याच रामलीला च्या गाण्याच्या वेळेची पडद्यामागची कहाणी सांगणार आहे. जी जावेद अखतर यांनी एका मुलाखतीत सांगितली होती.
एके दिवशी त्यांना सकाळीच आशुतोष गोवारीकरचा फोन आला. "सर, तुम्हाला आजच निघावे लागेल. एका प्रसंगावर एक गीत हवे आहे. माथेरानला शुटींग चालू आहे. तुम्हाला तिकडे यावे लागेल.." संध्याकाळ पर्यंत ते तिथे पोहचले. पोहचल्यावर कळले की रहमानने धुन बनवून पाठवली आहे. त्यानुसार गीत लिहायचे आहे. पण ज्या प्रसंगावर गीत लिहायचे होते तो प्रसंग वाचून त्यांना खुप टेंशन आले. प्रसंग होता, सिनेमात 'रामलीला' चालू आहे आणि रावणाने सीतेचे हरण केले आहे. त्यावेळी सीता रामाची आर्ततेने विनवणी करत आहे आणी रावण सीतेला राम येणार नाही हे सांगत आहे . त्यावर आधारीत गीत लिहायचे होते.
त्यांनी आशुतोषला सांगितले की "मला तुम्ही आधी तरी सांगायचे मी रामायण किंवा रामचरीत मानस आणले असते. यावर माझा फारसा अभ्यास नाही. रामलीला ऐकली आहे पण ती लहानपणी ..आता ते आठवणे अवघड आहे. एक तर मी मुस्लिम आहे. थोड काही चुकल तरी मोठा वाद होवू शकतो."
आशुतोष त्यांना म्हणाला "सर तुम्हाला हे करावच लागेल. उद्या सकाळी याची रेकॉर्डिंग करायची आहे. तुम्ही रात्री विचार करा. मला माहीती आहे तुम्ही हे करू शकता... " नंतर त्यांना रात्र भर झोप लागली नाही पण सकाळी उठल्यानंतर अवघ्या अर्ध्यातासात गाणं लिहून तयार झाले. आशुतोषच्या टीम मधे लगान पासून 'अवधी' भाषेचे अभ्यासक असणारे एक पंडीत होते. गीत वाचल्यावर ते अवाकच झाले. ते बोलले की " हे कसे शक्य आहे. यातल्या बऱ्याचशा ओळी रामचरितमानस मधल्या जशाच्या तशा आहेत." जावेद साहेबाना देखील नवल वाटले की अस कस काय होवू शकते. कदाचित लहानपणी पाहीलेली रामलीला कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असावी किंवा काही चमत्कार घडला असेल त्यांना काही कळलेच नाही
बऱ्याचदा अगदी घाईमध्ये केलेली गोष्ट खूप उत्कृष्ट होते, हे गाणं त्याच उत्तम उदाहरण आहे. कारण हे लिहिलंही ऐन वेळेवर. रहमान ने हि खूप गडबडीत याची धून बनविली होती. यात मुख्य गायक मधुश्री आणि विजयप्रकाश हे आहेत. पण रावणासाठी जो गायक होता तो ऐनवेळी पोहचू न शकल्यामुळे खुद्द आशुतोष गोवारीकरने रावणाला यात आवाज दिलाय. अश्या सगळ्या गडबडीत हे मास्टरपीस असलेलं गाणं तयार झालय.
माझी विनंती आहे कि, सगळ्यांनी एकदा तरी हे गाणं जरूर बघावं. गाण्याच्या पूर्ण ओळी या पुढीलप्रमाणे आहेत.
सीता : आ आ आ आ आ
पल पल है भारी वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई
आओ रघुवीर आओ, रघुपति राम आओ
मोरे मन के स्वामी, मोरे श्रीराम आओ
राम-राम जपती हूँ, सुन लो मेरे राम आओ
राम-राम जपती हूँ, सुन लो मेरे राम जी
कोरस: बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
इसी क्षण तुम आओ, मुक्त कराओ,
सुन भी लो अब मेरी दुहाई
पल पल है भारी, वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई
रावण: राम को भूलो, ये देखो रावन आया है
फैली सारी सृषटी पर जिसकी छाया है
क्यों जपती हो राम-राम तुम?
क्यों लेती हो राम नाम तुम?
राम-राम का रटन जो ये तुमने है लगाया
सीता, सीता तुमने राम में ऐसा क्या गुन पाया?
सीता: गिन पायेगा उनके गुण कोई क्या, इतने शब्द ही कहाँ हैं
पहुंचेगा उस शिखर पे कौन भला, मेरे राम जी जहाँ हैं
जग में सबसे उत्तम हैं, मर्यादा पुरुषोत्तम हैं
सबसे शक्तिशाली हैं, फिर भी रखते संयम है
पर उनके संयम की अब आने को है सीमा
रावण समय है माँग ले क्षमा
कोरस : बजे सत्य का डंका, जले पाप की लंका
आये राजा राम, करें हम प्रणाम
संग आये लक्षमन जैसे भाई
सीता : पल पल है भारी, वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई
रावण : राम में शक्ति अगर है, राम में साहस है तो
क्यों नहीं आये अभी तक वो तुम्हारी रक्षा को?
जिनका वर्णन करने में थकती नहीं हो तुम यहाँ
ये बताओ वो तुम्हारे राम हैं इस पल कहाँ??
सीता : राम हृदय में हैं मेरे, राम ही धड़कन में हैं
राम मेरी आत्मा में, राम ही जीवन में हैं
राम हर पल में हैं मेरे, राम हैं हर श्वास में
राम हर आशा में मेरी, राम ही हर आस में
मोहन (शाहरुख) : हो
राम ही तो करुणा में हैं, शान्ति में राम हैं
राम ही हैं एकता में, प्रगती में राम हैं
राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं
देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं -२
राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं
मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं -२
को : हो
सीता : पल पल है भारी, वो विपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई
कोरस : सुनो राम जी आये, मोरे राम जी आये
राजा रामचंद्र आये, श्री रामचंद्र आये
राम जी आये, मोरे राम जी आये
श्री रामचंद्र आये
शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment