तारीख : ०९ मार्च
१९९३
ठिकाण : नागपाडा पोलीस स्टेशन,
मुंबई
गुल
मोहंमद नावाच्या गुंडाला पोलिसांनी
दंगली मध्ये सहभाग
असल्याने अटक केली.
पोलीस चौकशीत गुल
सांगतो की, मुंबईत
थोड्या दिवसांनी बॉम्ब फुटणार
आहेत. शिवसेनाभवन, मंत्रालय,
stock exchange उडवणार आहे. पण
हे ऐकून पोलीस
त्याला वेड्यात काढतात. त्यानंतर
तीन दिवसांनंतर मुंबईच्या
इतिहासातील तो भयानक,
काळाकुट्ट दिवस उगवतो
- १२ मार्च! मुंबईत
एक पाठोपाठ एक
असे १३ साखळी
स्फोट होतात आणि
मुंबई हादरते. या
प्रसंगापासून अनुराग कश्यपच्या "ब्लॅक
फ्रायडे" सिनेमाची सुरुवात होते.
हुसैन झैदी यांच्या
"ब्लॅक फ्रायडे" कादंबरीवर आधारित अनुरागच
कश्यप चा सिनेमा.
भारतात सर्वप्रथम झालेल्या या
भीषण आतंकवादी हल्ल्याचा
इतका नेमका आणि
अचूक चित्रण करणारा
सिनेमा अजूनतरी माझ्या पाहण्यात
नाही. टायगर मेमन
(पवन मल्होत्रा), राकेश
मारिया (के के
मेनन) आणि बादशाह
खान (आदित्य श्रीवास्तव)
या सिनेमातील तीन
प्रमुख व्यक्तिरेखा.
सिनेमातील प्रमुख व्यक्तिरेखा
टायगर मेनन चा माहीम
मध्ये उद्योग असतो
, १९९२/९३ च्या
दंगलीत त्याच्या धंद्याला मोठा
फटका बसला आणि
त्याने याचा सुड
घ्यायचं ठरवलं. त्याने दंगलीत
होरपळलेले मुस्लिम तरुण शोधले.
त्यांना प्रशिक्षण दिलं आणि
स्फोट घडवून आणले.
स्फोट घडवतांना झालेल्या
एका चुकीमुळे हे
सगळे दहशतवादी एका
पाठोपाठ पकडले गेले हि
या सिनेमाची मुख्य
कथा. पुष्कळशा व्यक्तिरेखा
आणि भिन्न घटनांचे
संदर्भ असलेल्या या सिनेमाची
कथा/पटकथा विणणे
अतिशय जोखमीचे काम.
९२च्या दंगली, टायगरच प्लँनिंग,
दाऊद आणि ISI चा
सहभाग, बॉम्बस्फोट, अटकसत्र, बादशाह
खान या आरोपीचं
पोलीस विटनेस बनणं
असा सिनेमाचा प्रवास
उलगडत जातो. पुस्तकात
आलेल्या तपशीलानुसार घटना जशा
घडल्या तशाच दाखवण्यावर
भर दिला आहे.
त्याला उगीच बॉलीवूड
तडका नाही.
हिंदू-मुस्लिम जातीय
दंगलीचा संदर्भ असल्याने संवाद
अतिशय टोकदार आणि
पकड घेणारे आहेत.
काही ठिकाणी शिव्यांचा
उल्लेख आहे पण
तो केवळ गरज
म्हणून. इंडिअन ओशननी दिलेलं
पार्श्वसंगीत भन्नाट! बॉम्बस्फोट झाल्यावर
आलेली सुन्नता दाखवण्यासाठी
केलेला संगीताचा वापर केवळ
अप्रतिम. सिनेमातील "बंदे" हे गाणं
बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. मुंबईतील
विविध ठिकाणे, मुस्लिम
बहुल वस्ती, दुबई
आणि पाकिस्तानात दाखवलेली
ठिकाणे कॅमेरातून जिवंत टिपली
आहेत. स्फोटाची घटना
पडदयावर बघतांना तर छुपे
कॅमेरा लावून खरोखर त्या
वेळेची घटना चित्रित
केली की काय
इतकी वास्तववादी वाटतात.
हा सिनेमा पाहिल्यावर
अनेक धक्कादायक गोष्टींची
माहिती मिळते जसं बॉम्बस्फोट
झाल्यावर मंत्रालयात जाऊन बेछूट
गोळीबार करण्याचा टाइगरचा प्लॅन
होता, BMC उडवणार होते पण
प्लँनिंग फसल्याने सुदैवाने हे
घडलं नाही. मुंबई
पोलीसांनी ज्या तडफेने
याचा शोध घेतला
तो प्रशंसनीय पण
त्याच वेळी आपल्याच
कस्टमच्या लोकांना RDX चं लँडिंग
कधी आणि कुठे
होणार आहे याची
विस्तृत माहिती असुनही पैसे
खाऊन त्यांनी आपला
आत्मा विकला.या
घटनेला आज जवळपास
२७ वर्ष उलटून
गेल्यावरसुद्धा त्याची धग तितक्याच
तीव्रतेने जाणवते .
सिनेमा
परिणामकारक होण्यासाठी आयडियल कास्टिंग
गरजेची असते. मुख्य भूमिकांबरोबरच
सिनेमात अनेक लहान-मोठे पात्र
आहेत. पण प्रत्येकाने
इतकं सुरेख काम
केलय की त्यामुळेच
सिनेमा अजून वास्तववादी
वाटतो. किशोर
कदम (इन्स्पेक्टर डांगले),
विजय मौर्य (दाऊद),
गजराज राव (दाऊद
फणसे), इम्तियाझ अली (याकूब
मेनन) महत्वाच्या भूमिकेत
दिसतात.
सिनेमात
नवाझुद्दीन सिद्दीकी पण छोट्या
पण महत्वाच्या भूमिकेत
आहे. टायगर मेनन
च्या मॅनेजर ची
असगर मुकादमची भूमिका त्याने
केलीय, सर्वात अगोदर पकडला
जाऊन पोलिसाना इतर
आरोपींची नावे आणि
हल्ल्याचा नेमका घटनाक्रम तो
सांगतो. पोलीस स्थानकातील कबुलीजबाब
देत असलेला सिन
नवाझ ने तुफान
साकारलाय.
आदित्य
श्रीवास्तव म्हणजेच आपल्या सी.आय.डी.
या मालिकेतला इन्स्पेक्टर
अभिजित चा अनुरागने
एक अतिशय ताकदवर
भूमिका आदित्यला दिली आणि
आदित्यने त्याचं सोन केलं
. आदित्यच्या पात्राचं नाव बादशहा
खान असलं तरी
त्या पात्राच्या नशिबी
एक केविलवाणी फरफट
आहे . एका साधा
सरळ माणूस धर्माच्या
नावावर भडकावला जातो . तो
मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात
अडकतो . पण त्याला
या कटात सामील
करून घेणारा टायगर
मेमन पाकिस्तानात निघून जातो . बादशहा
आणि त्याच्यासारख्या कित्येक
प्याद्यांना वाऱ्यावर सोडून . सर्वस्व
हरवलेला विमनस्क बादशाह खान दिल्ली
पासून जयपूरपर्यंत पोलिसांपासून
वाचण्यासाठी फिरत राहतो
. एका लॉजमध्ये जाऊन
'एक सस्ता कमरा
चाहिये , सस्ता ' असं पिळवटून
तो बोलतो तेंव्हा
हा बॉम्बस्फोटातला आरोपी
आहे असं माहित
असून पण बादशहा
खानसाठी काहीतरी तुटत. बादशहा
खान मूर्तिमंत साकारणाऱ्या
आदित्य श्रीवास्तवला सलाम .
ब्लॅक फ्रायडे म्हणजे पवन मल्होत्राच्या अभिनयाचा
सोहळा आहे. त्यात एक प्रसंग आहे . बॉम्बस्फोट
करण्याच्या कटात सामील
असणाऱ्यांची एक मिटिंग
टायगर मेमन घेतो . त्यात तो
सगळ्यांना एक गर्भित
धमकी देतो . "जे
लोक तोंड उघडतील
त्याला तर मी
मारेलच . पण त्याच्या
अगोदर त्याच्या अख्ख्या
खानदानाला मारेल ."ती धमकी
ऐकून पिक्चर पाहणाऱ्या
प्रेक्षकांच्या अंगावर सरसरून काटा येतो. दुसऱ्या
एका प्रसंगात बादशहा
खान ला रूममध्ये
बोलवून ,"किधर का
बादशाह तू ? " असं गुर्मीत
विचारतो आणि त्याला
लंबचौड भाषण देऊन, त्याच
ब्रेन वॉश करून
त्याला कटात सामील
करून घेतो . दंगलीमध्ये त्याचं दुकान
जाळल्यावर "अक्खा माहीम जला
देगा मैं, टायगर
का ऑफिस जलाता
है??" अशी धमकी
ओरडून देतो . पवन
मल्होत्रा शिवाय ब्लॅक फ्रायडेची
कल्पनाच करता येत
नाही.
माझा अत्यंत आवडता
अभिनेता के के
मेनन ने साकारलेली
ऐसीपी राकेश मारिया
यांची भूमिका हि
त्याच्या आजवरच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम
भूमिकांतील एक भूमिका
आहे. अगदी शांत
आणि संयत पोलीस
ऑफिसर त्याने उभा
केलाय, जो कि
टिपिकल बॉलीवूड सिनेमांपेक्षा खूप
वेगळा आहे. के
के हा गतप्राण
व्हायचा विषय आहे.
तो भूमिकेचं जे
बेअरिंग घेतो आणि
सोबत त्याची जबरदस्त
डायलॉग डिलेव्हरी म्हणजे हॅट्स
ऑफ आहे. या
सिनेमात देखील आपल्या जुनिअर्स
ऑफिसर्स ला सूचना
देणे असो कि
पत्रकारांच्या तिरकस प्रश्नांना उत्तरे
देणे असो. स्क्रीन
वर अगदी खराखुरा
पोलीस उभा आहे
असं वाटावं इतपत
त्याने भूमिकेत जान ओतलीय.
या सिनेमात दोन प्रसंग माझ्या अत्यंत आवडीचे
आहेत त्यातला पहिला इम्तियाझ गवांदे
नावाच्या आरोपीला पकडण्यासाठीचा चेस
सीन आहे. आजवरच्या
हिंदी सिनेमात इतका
खराखुरा चेस सीन
मी अजून पर्यंत
नाही बघितलाय. याच
सिन मध्ये एका
झोपडीजवळून पाठलाग सुरु असताना
तिथे टीव्हीवर अमर
अकबर ऍंथोनी सिनेमातील
डायलॉग बॅकग्राऊंड ला ऐकू
येतो. "ऐसा तो
आदमी लाईफ मी
दोइच टाइम भगत
हें, ऑलिम्पिक का
रेस हो या
पुलिस का केस
हो" जबरदस्त टायमिंग ला
हा डायलॉग ऐकू
येतो.
दुसरा प्रसंग के के मेनन
आणि आदित्य समोरासमोर
येतात तो प्रसंग
चित्रपटाचा हायलाईट आहे .देशातल्या
मुसलमानांवर बाबरी मस्जिद पाडल्यानंतर
कसे अत्याचार झाले
याचं थोडं खर
आणि बरचस अतिरंजित
(टायगरने डोक्यात भरवलेलं ) वर्णन
बादशहा खान करतो
. वर 'अल्ला हमारे
साथ था , इसलिये
हम ये जंग
जीत गये ' अशी
मखलाशी करून स्वतःची
केविलवाणी समजूत घालून घेतो
. मग के के 'इस
बार अल्ला हमारे
साथ था ' अशी
सुरुवात करून मग
त्याच्या युक्तिवादाच्या चिंधड्या करतो . अतिशय
प्रभावी आणि अंगावर
काटा आणणारा सीन
. हा सीन जितका
केकेचा आहे तितकाच
आदित्यचा आहे . कुठल्याही धार्मिक
संघटनेच्या / पक्षाच्या प्रपोगंडाला
बळी पडून आयुष्याची
होळी झालेल्या प्रत्येक
माणसाचं प्रतीकात्मक मूर्त स्वरूप
म्हणजे बादशहा खान . धार्मिक
ध्रुवीकरणाच्या या काळात
देशात कानाकोपऱ्यात सर्वधर्मीय
बादशहा खान तयार
होत असताना खरं
तर 'ब्लॅक फ्रायडे
' पुन्हा
प्रदर्शित करायला पाहिजे . लोकांना
भडकवणारे नेते एशोआरामी
आयुष्य जगत असताना
त्यांच्या कार्यकर्त्यांची काय अवस्था
होत असते ते
या चित्रपटातली बादशहा
खानची शोकांतिका बघून
किमान काही लोकांना
तरी कळेल .
शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment