Tuesday, September 17, 2019

नरेंद्र दामोदरदास मोदी




गुजरात मधल्या वडनगर येथे जन्म, हलाखीच्या परिस्थितीमुळे रेल्वेत विकावा लागलेला चहा, लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक, पुढे तरुणपणी संघाचे पूर्ण वेळ प्रचारक म्हणून कार्य, नंतर संघानेच आदेश दिल्यामुळे काहीश्या अनिच्छेने भारतीय जनता पक्षाचे कार्य करण्यासाठी राजकारणात प्रवेश, पुढे सलग १३ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता गेल्या ६ वर्षांपासून भारतदेशाचे लाडके पंतप्रधान असा विलक्षण यशस्वी प्रवास केलेले आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी आज वयाची ६९ वर्ष पूर्ण करून सत्तरीत प्रवेश करताय.

लौकिकार्थाने कुठलाही अनुभव नसताना मोदी राजकारणात आले. आता कदाचित खोटे वाटेल पण राजकारणात येण्याची त्यांची इच्छा नव्हती, संघाचे प्रचारक म्हणूनच त्यांना कार्य करायचे होते. पण संघसंस्कार असल्यामुळे संघाने दिलेला आदेश शिरसावंद्य मानून ते राजकारणात आले. प्रथम संघटनात्मक काम केले. मग त्यांना भाजपाने मुख्यमंत्री म्हणून काम करायला सांगितले, आजच्या तारखेत देशातील सर्वात यशस्वी राजकारण्यांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमावर आहे. भारत देशाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करीत आहे. पूर्ण राजकीय कारकीर्द सत्तेच्या अग्रक्रमावर राहूनही भ्रष्टाचाराचा, गैरव्यवहाराचा साधा एकही आरोप आजवर झालेला नाही आहे. यातच त्यांच्यातील यशस्वी नेत्याची छाप दिसते. 

आज खंबीरपणे भारतदेश त्यांच्या नेतृत्वाखाली जगात उभा आहे. "राष्ट्राय स्वाहा, इदम न मम" ही भावना असते तेंव्हाच इतकी मनाची स्थिति होते, दैव बलवत्तर असावे लागतेच पण आपण स्वत: पण खंबीर पणे उभे रहावे लागते. सांगितलेले काम स्वीकारून ते निष्ठेने करण्याची मनाची समतानता असावी लागते. हेच त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे.

चरैवेती चरैवेती, यही तो मंत्र है अपना।
नही थकना, नही रुकना,
सतत चलना, सतत चलना।।

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा साहेब...!!!

शुभम शांताराम विसपुते 

1 comment: