सोनू निगम म्हणजे अफाट रेंज असलेला गायक. अगदी कुठल्याही प्रकारचं गाणं तितक्याच कॅव्हेन्शिअली गाणारा. हाय पीच मध्ये गाण्याच्या बाबतीत त्याच्या समवयस्क असलेला कोणताही गायक त्याच्या जवळपासही येऊ शकत नाही. इतका तो एफर्टलेस हाय पीच मध्ये गातो. ऐकताना आपल्याला वाटत कि किती सहज हा इतक्या वरच्या आवाजात गातोय, अर्थात हे त्याच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीमुळे शक्य झालय. गेल्या २४-२५ वर्षांपासून तो सातत्याने गातोय, पण त्याचा आवाज आजही तितकाच गोड आहे. रोमँटिक, क्लासिकल, क्लब सॉंग्स, डान्स नंबर, दर्दभरे, देशभक्तीपर, सुफी, भजन, गज़ल गाण्यातला असा एक हि फॉर्म नाहीए ज्यात सोनू गेला नसेल. अजून एक खास गोष्ट म्हणजे, भजन आणि सुफी गाण्यांबरोबरच "बुद्ध हि बुद्ध है" या अल्बम मध्ये बुद्धासाठी सुद्धा गाणं गायलंय. कदाचित बॉलीवूड मधला एकमेव कि ज्याने बुद्धिस्ट गाणं गायलंय.
३० जुलै १९७३ ला फरिदाबाद मध्ये त्याचा जन्म झाला. वडील ऑर्केस्ट्रा सिंगर असल्याने त्याच्या घरातच गाणं होत. अश्यातच ४ वर्षांचा असताना एकदा हौस म्हणून वडिलांच्या ऑर्केस्ट्रा मध्ये मोहम्मद रफी यांचं "क्या हुआ तेरा वादा" हे गाणं त्याने सादर केलेलं. हा त्याचा पहिला स्टेज परफॉर्मन्स. त्याच्यावर रफी यांचा जो प्रभाव आहे त्याच मूळ हे आहे. लहानपणीच मुलाची गाण्यातील आवड पाहून त्याच्या वडिलांनी त्याला उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडे शिकायला ठेवलं. पुढे वयाच्या १८ व्या वर्षी तो गाण्यात करिअर करण्यासाठी मुंबईत आला.
९० च्या दशकातील "बेवफा-सनम" या सिनेमापासून तो नावारूपाला आला. यातलं 'अच्छा सिला दिया तुने' हे प्रेमात धोका खाल्लेल्यांचं राष्ट्रीय गाणं सोनू निगमच्या नावावर आहे. नंतरच्या काळात बऱ्याच वेळी सिनेमात उदित च्या आवाजातल गाण्याचं हॅपी व्हर्जन तर सोनू च्या आवाजातल सॅड व्हर्जन असायचं. उदा. बेवफा मधील "एक दिलरुबा है" उदित च्या आवाजात तर "एक बेवफा है" सोनू च्या आवाजात आहे. आता तो बऱ्यापैकी स्थिरावला होता. "एक लडकी को देखा तो ऐसा लगा" हे कुमार सानूचं सिग्नेचर गाणं अगोदर सोनू गाणार होता पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. सोनू च्या आवाजातील हे गाणं इमॅजिन करूनच गूसबम्प येतो. त्याच काळात त्याने झी टीव्हीवर "सा रे ग म पा" च सुत्रसंचलन केलं. ज्याची विजेती "श्रेया घोषाल" होती. सोनू निगम ने नंतर स्वतःचे पॉप अल्बम पण केले. त्यात दिवाना, याद, परियो सी, चंदा कि डोली अशे बरेच अल्बम आहेत. या सगळ्यात "दिवाना" बेस्ट. मोहम्मद रफी याना ट्रीबुट म्हणून त्यांच्याच गाण्यांचा "रफी कि यादे" नावाचा अलबम पण त्याने केला.
१९९७ साल हे सोनू निगम साठी आयुष्यभर लक्षात राहील असं होत. या वर्षी त्याच्या करिअर मधील दोन माईलस्टोन गाणी त्याला मिळाली. पाहिलं होत "बॉर्डर" मधील अनु मलिक ने संगीत दिलेलं "संदेसे आते हे". रूप कुमार राठोड सोबतच त्याच हे डुएट गाणं अजरामर आहे. जवळपास १० मिनिटांचं हे गाणं आहे. यात रूप कुमार जरी असला तरी लक्षात राहतो तो सोनूचं. यातील 'ए गुजरने वाली हवा बता, मेरा इतना काम करेगी क्या' हे सोनू ने ज्या फीलिंग्स ने म्हटलंय, ते एकूण वाटतं की त्या हवेने त्याच काम खरंच अगदी आवडीने केलं असेल.अनु मलिकचे या गण्यासाठी खरंच आभार मानायला हवे. म्हणूनच असेल कदाचित पुढच्या काळात या दोघांनी मिळून खूप उत्तम गाणी दिलीत. अनु मलिक ने नंतर सगळी खास गाणी सोनू ला दिली. दुसरं गाणं होत, "परदेस" मधील "ये दिल दिवाना". माझं ऑल टाइम फेव्हरेट. शाहरुख-सोनू ची जोडी या गाण्यापासूनच जमली. "दिल पे मेरा जोर नही है, में क्या करू" हे ज्या वेदनेने तो गातो. कदाचित स्क्रीनवर तितकी वेदना शाहरुखला ही झाली नसेल. अगोदर म्हटल्याप्रमाणे जबरदस्त कॅव्हेन्शिअली गाणारा.
सोनू निगम हा अस्सल हिरा रहमान सारख्या अव्वल जोहरी च्या नजरेत आला. रहमान ने त्याला दिल से मधलं "सतरंगी रे" हे जबरदस्त गाणं दिलं. रहमान ने नंतर सोनू सोबत खूप छान छान गाणी दिलीत. त्यात "साथिया" सारखं प्युअर रोमँटिक गाणं आहे. पुकार मधील अनुराधा सोबतच "किस्मत से तुम" सारखं क्लासिकल टच असलेलं गाणं, जोधा अकबर मधलं रोमँटिक सुफी गाणं "इन लहमो के दामन में". ताल मधील "इश्क बिना" या गाण्यातील सोनूची "तुमने इश्क का नाम सुना है, हमने इश्क किया है" ही ओळ म्हणजे हृदयावरून फिरवलेलं मोराचं पीस आहे. रहमान-सोनू जोडीचं माझं पर्सनल फेव्हरेट द लिजंड ऑफ भगतसिंग मधील क्लायमॅक्स ला असलेलं "मेरा रंग दे बसंती चोला". भगतसिंग, राजगुरू, सुखदेव तिघेही फाशीवर चढण्यासाठी एकदम ख़ुशी ख़ुशी निघालेय, सोबत हे गाणं म्हणत ते त्यांचं शेवटचं मार्गक्रमण करताय. "महकेंगे तेरी फिज़ा में हम बन के हवा का झोंका, किस्मत वालों को मिलता ऐसे मरने का मौका" सोनू च्या आवाजातल्या या ओळी ऐकताना आजही एक सरसरून काटा जरूर येतो.
संघर्ष सिनेमातील "मुझे रात दिन" सारखं तरल गाणं, रिफ्युजीची सोनूची सर्वच गाणी, वास्तव सारख्या हार्ड हीटिंग सिनेमातलं कविता सोबतच "मेरी दुनिया है" सारखं सिनेमातील रक्तपातापासून जरा वेळ रिलीफ देणार गाणं, इस्माईल दरबार सारख्या गुणी म्युझिक डायरेक्टर ने दिलेले अतिशय हाय पीच मधलं "तेरा जादू चल गया" हे फुल्ल आवाज करून ऐकण्यासारखं गाणं आहे. RHTDM चा टायटल ट्रॅक, सलमानच्या लकी सिनेमातील "चोरी चोरी" आणि "सुन जरा" हि कल्ट गाणी, ओम शांती ओम मधील "तुमको पाया तो जेसे खोया हूं" आणि स्ट्राईकर नावाच्या सिनेमातील "चम चम" सारखी छान हळुवार रोमँटिक गाणी, अशी कितीतरी सुंदर गाणी त्याची आहे.
काही गाण्यांमधला सोनू चा गेस्ट अपिअरन्स पण भारी आहे. गजनीच्या "गुझारिश" गाण्यातला त्याचा हुमिंग साऊंड मधला आलाप असो की, जगजीत साहेबांच्या "कोई फरियाद" मधला आलाप, दोघी गाण्यात त्याचा आवाज उठून दिसतो. सोनूचे काही अंडररेटेड गाणी आहे. जी फारशी गाजली नाहीत, पण खूप भारी होती. तो बात पक्की या सिनेमातील "फिर से" नावाचं खूप मस्त गाणं होत. तसंच तनु वेड्स मनू च्या अल्बम मध्ये असलेलं पण सिनेमात नसलेलं "ओ साथी मेरे" हे गाणं. सिनेमात नसल्यामुळे इतक्या सुंदर गाण्याला हवी तितकी प्रसिद्धी मिळाली नाही.
सोनू कुठल्याही मूडच गाणं तितक्याच कॅव्हेन्शिअली गातो. पण जेव्हा तो विरह गीत गातो, तेव्हा मात्र तो आपल्याला त्या वेदनेसोबत जोडतो. कल हो ना हो मधील "हर घडी बदल रही है" सारखं वेदनेच गाणं, आता हळूहळू सगळं संपणार आहे, त्यामुळे जितका वेळ शिल्लक आहे तोवर पुरेपूर जगून घ्या. हे सांगायला स्क्रीनवरच्या कॅन्सर पेशंट शाहरुखला सोनू चा आवाज परफेक्ट मॅच होतो. तसच दुसरं गाणं हे अग्निपथ मधलं "अभि मुझ में कही" सारखं ओतप्रोत दुःख भरलेलं गाणं. सोनू ने इतकं आतून गायलंय की, हे गाणं ह्रितिक च न राहता सोनू च होऊन जातं.
सोनू निगम च्या गाण्यांबद्दल लिहायला जागा आणि शब्द कमी पडतील इतकं मोठं काम त्याने केलंय. आता मात्र तो फार सिलेक्टिव्ह काम करतो. त्यामुळे जास्त गाणी त्याची येत नाही. सोनू ने ज्या वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरुवात केली तशीच सुरुवात त्याचा मुलानेही केलीय. "कोलावेरी डी" गाणं त्याने गायलंय. आपल्या जनरेशन ला सोनू ने खूप दिलंय, अगदी तसंच त्याच्या मुलाने येणाऱ्या जनरेशनसाठी असच छान छान काम करावं इतकीच इच्छा...
शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment