दिग्दर्शक आनंद एल राय चा २०१३ साली आलेला हा सिनेमा. फक्त रहमान च संगीत आहे म्हणून थिएटर ला बघायला गेलेलो. नंतर मात्र एकाच आठवड्यात माझा मित्र हरीश आणि मी ३ वेळा हा सिनेमा पाहिला. माझ्यासारख्या थ्रिलर जॉनर च्या सिनेमांची आवड असणाऱ्या मुलाने एक लव्ह स्टोरी असलेला सिनेमा थिएटर ला ३ वेळा आणि नंतर असंख्य वेळा बघण्याचे खरं कारण म्हणजे एक सिम्पल लव्ह स्टोरी ला दिग्दर्शकाने थोड्याश्या ट्विस्ट अँड टर्न ने दिलेली ट्रीटमेंट आणि अर्थातच धनुष चा अभिनय.
बनारस मध्ये राहणारा एक तमिळी ब्राह्मण मुलगा कुंदन (धनुष) एक कडव्या मुस्लिम घरी जन्मलेल्या झोया (सोनम कपूर) मुलीची ही कथा. लहान असताना अगदी पहिल्यांदा झोया ला नमाज पढताना बघितल्यावर कुंदन तिच्या प्रेमात पडतो. या वेळी बॅकग्राऊंडला असलेला धनुष च्या आवाजातील डायलॉग पण खास आहे. "नमाज मी वो थी पर लगता हें दुआ मेरी कुबुल हुई हे". नंतर शाळेत दोघांची भेट होते. सुरुवातीला ती त्याला इग्नोर करत असते. पण तो ही हीच पाहिजे यासाठी अडलेला असतो. शेवटी तिच्याकडून १७ वेळा थप्पड खाल्ल्यावर ती त्याला हो म्हणते आणि मग बॅकग्राऊंड ला वाजत असलेल्या "हमका इशक हुआ हे यारो" या जुन्या गाण्यावर कुंदन जबरी नाचतो एकदम. पुढे झोया च्या घरी याबदल माहित पडतं आणि अर्थातच तिच्या घरच्याना हे मान्य नसत. त्यामुळे तिला दिल्ली ला शिकायला पाठवले जाते. नंतर ती जेव्हा परत येते. तेव्हा कुंदन ला वाटत त्याच प्रेम परत आलाय. पण झोया ने कुंदन सोबतच प्रेम हे केवळ लहानपणीच अल्लड वयातलं प्रेम असं समजून ती कुंदन ला साफ विसरून गेलेली असते. कुंदन आज ही तिच्यावर तितकंच प्रेम करत असतो. ती त्याला सांगते लहानपणीच्या गोष्टी लहानपणीच विसरलेल्या बऱ्या, कुंदन ला मान्य होणं शक्यच नसत. त्याच दरम्यान तीच दिल्लीतल्या तिच्या सोबत शिकणाऱ्या अक्रम (अभय देओल) सोबत बनारस मधेच लग्न होणार असत. कुंदन ही इरेला पेटून शपथ घेतो कि ज्या दिवशी झोया च लग्न होईल त्याच दिवशी मी पण लग्न करेल म्हणून त्याच्या जिवलग मित्र मुरारी (झिशान अयुब) च्या बहिणीसोबत जी कुंदन वर जीवापाड प्रेम करत असते पण कुंदन च तिच्यावर अजिबात प्रेम नसत अश्या बिंदिया (स्वर भास्कर) शी लग्न करायचं ठरवतो. झोया च्या लग्नात कुंदन काय "ट्विस्ट" आणतो आणि तिथून सगळा सिनेमा कसा "टर्न" हे पाहण्याची मज्जा आहे.
पहिल्यांदा बघितल्यावर हा चित्रपट ओके ओके वाटतो पण नंतर जेवढ्या वेळा आपण बघू तेवढ्या वेळा हा चित्रपट आणि आपला हिरो कुंदन च्या नव्याने प्रेमात पडत जातो.उनाडक्या करणारा, फारसे शिक्षण नसणारा पण प्रेमात मात्र शंभर टक्के पाडणारा कुंदन अभिनेता धनुष ने अफलातून रित्या रंगवलाय.तो 15 वर्षांचा दाखवलाय तेव्हा ही तो 15 वर्षांचा वाटतो आणि 25 वर्षांचा दाखवलाय तेव्हा तो 25 वर्षांचा वाटतो! सोनम कपूर सारख्या अभिनेत्री कडून ते बरे काम करून घेतले आहे आनंद राय ने. अभय देओल नेहमी प्रमाणे भारी. खरी गमंत आणतात ते कुंदन चे मित्र झालेले मुरारी आणि बिंदिया, झिशान आणि स्वर ने चाबूक काम केलय एकदम.
चित्रपटाचे संवाद ही अतिशय भिडणारे आहेत.कोणत्याही प्रेमात असणाऱ्या,नसणाऱ्या मुलांना व मुलांच्या मित्रांना ही पटकन अपील करणारे आहेत.मी पहिल्या सीन पासून जुडला गेलेलो ह्या चित्रपटासोबत आणि त्याचे कारण फक्त नी फक्त धनुष होते.त्याचे ते एकतर्फी प्रेम इतके मनाला भिडते कारण तसे प्रेम आयुष्यात कुणा न कुणावर आपण सर्वांनी केलेले आहे ,ज्यांनी केले नाही त्यांना पुढं जाऊन कधी न कधी होईल एकतर्फी प्रेम ! चित्रपटाची पहिली फ्रेम असो की शेवटची ,कुंदन च्या डोळ्यात झोया ला घेऊन असलेले प्रेम अतिशय सुस्पष्ट दिसते हेच ह्या चित्रपटाचे खरे यश होते.
ह्या चित्रपटातील संवाद आज ही अनेकांच्या व्हाट्स अप स्टेटस ला मी बघतो .ते संवाद काही खूप काही फिलॉसॉफी मांडणारे वगैरे नाहीत पण कुठंतरी आपल्या मनातल्या भावना मांडतात ते. सगळेच प्रसिद्ध असलेले संवाद काही मी इथं लिहीत बसणार नाही पण माझ्या मनातून अजून न गेलेला क्लायमॅक्स ला असलेला धनुष तो डायलॉग तो आज हि तितकाच भावतो. खूप मोठा डायलॉग आहे. लेखाच्या शेवटी तो दिलाय.
चित्रपटाला संगीत आहे लिजंडरी संगीतकार ए आर रहमान च. अस्सल भारतीय टच असलेली सगळीच गाणी खणखणीत आहे. संगीतासोबतच बॅकग्राऊंड पण रहमाननेच केलय. पूर्ण अलबम निव्वळ अप्रतिम असा आहे. श्रेया च "बनारसीया" प्रेमात पाडत. "तुम तक" पण खासच आहे. सुखविंदर च्या आवाजतील "पिया मिलेंगे" सारखं पॉवरफुल गाणं आहे. लग्नातली धमाल दाखवणार "ऐ सखी" सारखं गाणं आहे. "तू मन शुधी" थोडं रॉकिंग कॉलेज सॉन्ग आहे. तर "नजर लाये" सारखं प्युअर रोमँटिक गाणं देखील अलबम मध्ये आहे आणि सर्वात शेवटी स्वतः रेहमानच्या आवाजातलं "ऐसे ना देखो" सारखं शांत संयत गाणं आहे, त्यातले शब्द हे काळजाचा ठाव घेणारे आहे.
रांझना कुणाला आवडो न आवडो. ज्याला तेव्हा बघताना आवडला नसेल तर आता बघा, हा चित्रपट आणि कुंदन हे न विसरले जाणारेच आहेत !
शुभम शांताराम विसपुते
(धनुष चा क्लायमॅक्स चा डायलॉग)
‘बस इतनी हि कहानी थी मेरी..
एक लडकी थी जो बगल मे बैठी थी, एक कुछ डॉक्टर जो अभी भी इस उम्मीद मे थे कि शायद ये मुर्दा फिर जाग पडे..
एक दोस्त था, जो पागल था.. एक और लडकी थी जिसने अपना सब कुछ हार दिया था मुझपे..
मेरी मा थी, बाप था, बनारस कि गलिया थी, और ये एक हमारा शरीर था जो हमे छोड चुका था.
ये मेरा सीना जिसमे अभीभी आग बाकी थी..
हम उठ सकते थे, पर किसके लिये? म चीख सकते थे, पर किसके लिये?
मेरा प्यार झोया, बनारस कि गलिया, बिंदिया, मुरारी, सब मुझसे छूट रहा था.
मेरे सीने कि आग या तो मुझे जिंदा कर सकती थी या मुझे मार सकती थी.
पर साला अब उठे कौन? कौन फिरसे मेहनत करे दिल लगाने को.. दिल तुडवाने को..
अबे कोई तो आवाज दे के रोक लो!
ये जो लडकी मुर्दा सी आखे लिये बैठी ही बगल मे, आज भी हा बोल दे तो महादेव कि कसम वापस आ जाए!
पर नही, अब साला मूड नही. आखे मुंद लेने मे हि सुख है, सो जाने मे हि भलाई है.
पर उठेंगे किसी दिन.. उसी गंगा किनारे डमरू बाजाने को.. उन्ही बनारस के गलियो मे दौड जाने को, किसी झोया के इश्क मे फिर से पड जाने को..!’

No comments:
Post a Comment