मुख्य गाण्यात फक्त एखादी ओळ किंवा आलाप गाण्यासाठी दुसरा एखादा गायक/गायिका येऊन पूर्ण गाण्याला वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो, त्यातही मुख्य गायकांबरोबरच कॅमिओ करणारेही लक्षात राहतात. यातीलच काही निवडक गाणी...
१) सोनू निगम चा गजनी मधल्या "हे गुझारिश" गाण्यातला आलाप
२) स्वर्णलता चा पुकार मधल्या "सुनता है मेरा खुदा" मधला हुमिंग साउंड
३) रहमान चा युवा मधला "कभी नीम नीम" गाण्यातला कॅमिओ
४) के के चा देवदास मधील "हे डोला रे" हे फक्त तीन शब्द आणि आलाप
५) शंकर महादेवन परदेस मधील "ये दिल दिवाना" मधला आलाप
६) सोनू निगम चा तुम बिन मधील जगजीत सिंग साहेबानी गायलेल्या "कोई फरियाद" मधला आलाप
७) सुखविंदर चा ताल मधल्या "नही सामने तू" गाण्यातील फक्त प्रेयसी हा शब्दावरची तान
८) रहमान ची बॉम्बे मधील "केहना हि क्या" गाण्यातील सरगम
९) परदा हे परदा गाण्यातील किशोर कुमार यांनी म्हटलेली "तो अकबर तेरा नाम नाही है" हि एकच ओळ
१०) 'फना' मध्ये चांद सिफारीश गाण्यात कैलाश खेरनं गायलेलं 'सुभानअल्लाह'
११) जब वी मेट मधील हम जो चलने लगे गाण्यातील उस्ताद सुलतान खान यांची तान
१२) कोई जाए तो ले आये मधलं,शंकर महादेवन ने म्हटलेलं "मारा रे,,,,"
१३) स्वदेस च्या यूं ही चला चल मध्ये हरीहरन चे योडलिंग
१४) तमाशा मधलं 'तु कोई और है' आणि रॉकस्टार मधलं 'और हो' ह्या गाण्यांमधला अल्मा फेव्हरेक चा कॅमिओ
१५) रोजा मधील छोटी सी आशा गाण्यातील रहमान चा कॅमिओ
१६) दिल से मधील सतरंगी रे गाण्यातील कविता कृष्णमूर्ती चा आलाप
१७) कभी अलविदा ना कहना च्या मितवा मधील शंकर महादेवन ची सुरुवात आणि मधली सरगम...
१८) लगान च्या मितवा मधील सुखविंदरचं "हर संत कहे साधु कहे, सच और साहस है जिसके मन में, अंत में जीत उसीकी रहे"
१९) हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या गाण्यातील डोमिनिक या गायिकेने गेलेला ऑपेरा स्टाईल आलाप
२०) लकिर मधील सदिया गाणं, हरिहरन आणि उदित नारायण मुख्य गायक पण कैलाश खेर ने फक्त "सदियाँ सदियाँ सदियाँ रे" एवढंच गायलंय
२१) RHTDM च्या "चुराया रे" गाण्यात शेखर रावजीयानी च्या केवळ "रहना है तेरे दिल में" या लाईन्स
२२) रोजा जानेमन गाण्यातील सुरुवातीचा आलाप सुजाता मोहन यांनी गायला आहे
२३) अरे रफ़्ता रफ़्ता देखो आँख मेरी लड़ी है गाण्यात "ये तुम क्या कह रहे हो ? मैने ऐसा तो नहीं कहा था" इतकंच म्हणणाऱ्या उषा खन्ना
२४) बडे अच्छे लगते है गाण्यात फक्त "और" म्हणणारी सुषमा श्रेष्ठा
शुभम शांताराम विसपुते

No comments:
Post a Comment