श्रीराम मंदिराच्या निर्मितीला सुरुवात होत आहे. इतका अमूल्य दिवस आपल्याला पहायला मिळतोय म्हणून आपण सगळे नक्कीच खूप भाग्यवान आहोत. अजरामर असणाऱ्या ह्या गोष्टीचे आपण साक्षीदार असणार आहोत. भुमिपूजनाची तारीख घोषीत झाल्यापासून वातावरण भारावून गेलय. मन उल्हासित झालंय.
५०० वर्षांचा कलंक मिटण्याचा शुभ दिवस आलेला आहे. गेल्या पाचशे वर्षांपासून आपल्या संस्कृतीचा आद्य पुरुष, आपल्या राष्ट्राची ओळख , आपल्या समाजाचा आदर्श, आपल्या अस्मितेच प्रतिक, कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीचा वाद, त्यामुळे झालेला संघर्ष, रक्तपात, अपमान या सर्व घटनांची नोंद मनात साठवून ठेवली होती. या सगळ्या गोष्टींचा बीमोड करुन श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक दिवस आला आहे.
अयोध्येत राम जन्मभूमीवर भव्य मंदिराचा शंखनाद होतो आहे. युगानुयुगे ज्या क्षणांची प्रतीक्षा समस्त हिंदू समाज करत होता तो क्षण जवळ आलेला आहे. जर का कोरोनाचे संकट नसते तर हा सोहळा आणखीन अभूतपूर्व झालेला असता आपल्यापैकी अनेकजण अयोध्येला गेले असते पण आपण आपल्या घरीच हा सोहळा अनुभवणार आहोत, आयुष्यभरासाठी हृदयात साठवून ठेवणार आहोत.
अर्थात काही विघ्नसंतोषी मंडळींच म्हणणं आहेच की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भूमिपूजनाचा कार्यक्रम करणं हे योग्य आहे का त्यांना एकच सांगणे आहे की, कोरोना आहे म्हणून आपण श्वास घ्यायचा थांबवला नाहीये आणि राममंदिर आमच्यासाठी श्वासापेक्षा कमी नाहीये.
अतीव श्रद्धा आणि आपला अधिकार सिद्ध करावे लागतात. प्रसंगी प्राणाची आहुती देऊन हक्क साबित करावे लागतात. आणि "हिंदू" यात कधी मागे रहात नाही. फक्त "हे आमचं" म्हणायला अजिबात गुणवत्तेची गरज लागत नाही, गरज लागते ती "हे आमचंच" आहे आणि ते डंके की चोट पर सिद्ध करण्याची.
५ ऑगस्ट २०२० ही तारीख एक यादगार बनून राहील येणाऱ्या असंख्य पिढ्यांसाठी आणि शिकवण देत राहील आपले हक्क अबाधित रहावे यासाठी गुणवत्तेच्या जोरावर अखंड संघर्ष करण्याची आणि गेलेल्या हक्कांवर विजय मिळवण्याची. मुळात इथे राममंदिर होते हे सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावे होतेच आणि ते ठासून मांडून सिद्ध करण्याची गुणवत्ताही होती हिंदूंमध्ये आणि सिद्ध केलीही. पाच तारखेला रामलल्लाच्या भव्य मंदिराच्या पायाभरणीचा भव्य समारंभ हिंदुस्थानचे लाडके कर्तव्यदक्ष पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र दामोदरदास मोदीजी यांचे शुभहस्ते होत आहे. करोडो हिंदूंच्या वतीने मोदीजी भूमिपूजन करणार आहे.
भूमिपूजनाच्या या मंगल प्रसंगी रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी सर्व ज्ञात-अज्ञात मंडळींच्या चरणी साष्टांग नमस्कार.
जय श्रीराम 🚩
शुभम शांताराम विसपुते
No comments:
Post a Comment